टॉप बातम्या

नागाचे संरक्षण हेच पर्यावरणाचे रक्षण - हरीश कापसे

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : नागपंचमी हा शेतकरी शेतमजूर व इथल्या सामान्य लोकाचा सण असून सापाविषयी समज गैरसमज दुर करुन नाग हा जरी विषारी प्राणी असला तरी निसर्गाचा एक महत्वाचा घटक असल्याने सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हटल्या जाते.

पुराणानुसार वासुकी तक्षक कालिया व इतर नाग वंशिय जाती असल्यामुळे नागवंशीया चे मुख्य ठाण असलेल नागपूर हे ठिकाण आपल्या विदर्भात असुन आपल्या राज्याची उपराजाधानी आहे. गैरसमजातून आज घडीला भितीपोटी अनगिणत सापाला मारले जाते आणि नागपंचमीला नागाला दुध पाजून पुजा केली जाते हा पूर्णता गैरसमज असून, संशोधनानुसार कुठलाही साप दुध पित नसताना त्याला जबरदस्तीने दुध पाजण्याचे प्रकार धार्मिकतेतून केल्या जाते.

नागाला कान नसल्याने तो जमिनींच्या कंपणानातून सावध होतो, साप कुणावरही डक धरत नाही, त्याचे खाद्य उंदीर बेडूक व इतर छोटे प्राणी असल्याच मत सर्प मित्राच सर्प अभ्यासकाच असून नागपचमी दरम्यान, पावसाच प्रमाण असल्याने साप बाहेर येत असून त्याला धार्मिक दृष्ट्या देव मानत असल्याने नागपंचमीला सापाची मनोभावे पुजा करून साप हा मानवाचा मित्र असल्याच मत जिवन सृष्टी सामाजिक संघटना वणी, अध्यक्ष हरिश कापसे यांचे आहे.
Previous Post Next Post