सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : गोहत्या बंदी कायदा पायदळी तुडवित आता गोधनाची तस्करी मारेगाव तालुक्यात अधिक प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे सिंचनाच्या संदर्भात चांगला तालुका असलेल्या मारेगाव तालुक्यातून ही गोधनाची तस्करी वाढल्याची भयावह स्थिती समोर आली आहे. याच तस्करीचा भांडाफोड करण्याची कामगिरी मारेगाव पोलिसांनी केली.
याप्रकरणात पोलिसांनी तब्बल १८ पशुधनांना जीवनदान मिळवून दिले. उमेश जनार्दन चाफले, शंकर संबा बोजेवार रा. मारेगाव असे आरोपीचे नाव आहे. तर नरेश चाफले व मारोती जगताप हे दोघे घटनास्थळावरुण पसार झाले आहे. रविवारी (ता.२०) रात्री आरोपी मारेगाव च्या दिशेने गोधन घेऊन जात होते. हा प्रकार विशाल किन्हेकर, अनुप महाकुलकर, रोशन पारखी व निकील मेहता, यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबत पोलिसांनी कळविले. पोलिसांनी खाकीचा इंगा दाखवत मालकी हक्काबाबत विचारपूस केली असता गोधन तस्करीचा भांडाफोड झाला. यांच्या वर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान,गायींना अमाणूसपणे दोराने बांधुन घेऊन जात होते.त्यामुळे मारेगाव तालुक्यात गोधनाची तस्करी अधिक वाढल्याचे पुन्हा या कारवाई ने समोर आले.
सदरची कारवाई उपपोलिस निरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर सावंत यांचे मार्गदर्शनात शंकर बोरकर, आनंद अलचेवार, अफजल पठाण, चालक जिड्डेवार यांनी केली.