सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : भारताच्या एका अविभाज्य घटक मणिपूर येथे घडलेली घटना ही अत्यंत क्रूर, लज्जास्पद तसेच देशाला कलंकित करणारी घटना आहे. सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत होत असतांना मारेगाव अल्पसंख्यांक सेल च्या वतीने आज दिलेल्या निवेदनातून तहसीलदार यांचे मार्फत मणिपूर सरकार चा निषेध केला गेला आहे.
एकीकडे देश विश्वगुरु होण्याची स्वप्न पाहत आहेत, मात्र देशातील जाती जमाती व अल्पसंख्यांक समजावर तसेच महिलावरील वाढणारे अन्याय अत्याचार सुरूच आहे, हे निंदनीय आहे. सरकार ची प्राथमिक जबाबदारी तेथील जनतेला सुरक्षा व न्याय देणे ही असताना, केंद्र आणि राज्य सरकार दुर्लक्षित करून बघ्याची भूमिका घेत आहे, हे सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी घटना आहे. त्यामुळे मारेगाव तालुक्यातील समस्त नागरिक या निवेदनाच्या माध्यमातून अल्पसंख्यांक सेलचे तालुका अध्यक्ष शाहरुख शेख यांच्या उपस्थितीत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करित आहे.
मणिपूर येथे दोन महिलांची विवस्त्र धिंड काढुन, अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधमांना फाशी दिली पाहिजेत, तेथील मुख्यमंत्री यांचा राजीनामा घ्यावा व हिंसक परिस्थिती वर आळा घालावा अशी मागणी महामाहीम राष्ट्रपती यांना निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी निवेदनावर नगरसेविका थारांगना पटेल, माजी आरोग्य सभापती खालिद पटेल, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष सय्यद समीर, अतिक शेख, मो आतिफ मो शाबीर, मदार तसलीम कुरेशी, शे आरिफ शे इस्माईल, शेख साजिद शेख रज्जाक, हंसराज तेलंग, जुनेद पटेल, अब्रार कुरेशी, सोहील कुरेशी, तौफिक शेख, निसार शेख, शेख शबनम, तौसीफ कुरेशी, नवाज कुरेशी, सोहेल शेख, अफरोज शेख, सरदाखां पठान, रवी तेलंग, लक्ष्मीकांत तेलंग, योगेश महाडुळे, मोहसीन में यामीन, तोफीक अली, आरीफ सय्यद, लतीफ कुरेशी, समीर कुरेशी, शेख अय्युब शेख बाबा, फिरोज शेख, हरिदास किनाके, मनोज कोवे, शुभम कडुकर, सचिन अरके, मनोहर मेश्राम, अनिकेत रोहणकर, आयुष्य मोहुर्ले, जफर सय्यद, अशोक मांदाडे, आमिर पठाण, शुभम खंडाळकर, गणेश महाडुळे, अस्नम जमीर शेख, प्रवीण बदकी, अंकुश कोवे, मोईन माजिद शेख, अंकुश मेश्राम आदीच्या सह्या आहेत.
मारेगाव अल्पसंख्यांक सेलच्या वतीने मणिपूर घटनेचा तीव्र निषेध
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 25, 2023
Rating:
