नगर उपाध्यक्षा हर्षा अनुप महाकुलकर यांनी मानले आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांचे आभार


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : शहरातील नागरी वस्ती झपाट्याने वाढत आहे. या वाढलेल्या भागात अनेक नागरी समस्या निर्माण होतात. त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. या भागाचे लोकप्रिय आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार म्हणून व त्यानंतर सुद्धा मारेगावच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला. त्यामुळे भविष्यात सुद्धा हीच भुमीका आपली असुन शहरांचा विकास ही निरंतर प्रक्रिया आहे,असे माध्यमातून नगर उपाध्यक्षा हर्षा अनुप महाकुलकर यांनी सांगितले. व आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांचे आभार मानले.
मारेगाव शहराच्या विकासासाठी ३ कोटीपेक्षा वर निधी मंजूर,खालीलप्रमाणे होणार विकास कामे 

प्रभाग क्रमांक सहा,सोनुले यांचे घरापर्यंत डांबरीकरण रस्ता, नाली बांधकामासाठी प्रभाग क्रमांक सहा मधील जुमनाके ते वांढरे व सोनुले ते कोलगांव रोड, सुभाष मत्ते ते राजु थाटे, विलास पोटे ते, निलेश भेंडे व निकम ते आष्टकर, मेन रोड डॉ. महाकुलकर ते सतिश पांडे, यांचे घरापर्यंत डांबरीकरण रस्ता, नाली बांधकाम करणे. प्रभाग क्रमांक तीन मधील महादेव मंदिर ते मार्डी रोड पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे.
प्रभाग क्रमांक पंधरा मधील विविध विठ्ठल आटा चक्की ते डोमाजी भादिकर यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता, भूमीगत नालीचे बांधकाम करणे. प्रभाग क्रमांक पंधरा, अनंता भोयर ते डोमाजी भादिकर, सुरेश वांढरे ते दासरवार साहेब, सोनटक्के, शरद खापने, माटे ते केळकर, सोमलकर ते धोपटे यांचे घरापर्यंत भूमीगत नालीचे बांधकाम करणे.
प्रभाग क्रमांक सोळा मधील चिकटे ते मुन, प्रमोद जांभूळकर ते आशिष आस्कर, खंडारे ते देवाळकर, विठ्ठल ठक ते अनिल देहांडे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता व भूमीगत नालीचे बांधकाम करणे. प्रभाग क्रमांक सोळा मधील विविध ठिकाणी गणेश गोहोकार ते टायगर झाडे, देविदास खोले ते आनंद झोडे, धोपटे ते दरेकार, काटकर ते गाणार, ठक ते आनंद झोडे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे. असे ३.५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने शहराचा विकास साधता आहे. 
वणी मतदार संघांचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या आमदार निधीतून तब्बल ३ कोटी पेक्षा वर निधीच्या पायाभुत विकास सुविधांकरिता मंजूरी मिळाल्याने या माध्यमातून मारेगाव शहराचा विकास मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे, इतरही सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्याचे मत नगर उपाध्यक्षा हर्षा अनुप महाकुलकर यांनी व्यक्त केले आहे.

साहेबांनी मागणीची दखल घेत मारेगाव शहराच्या विकासासाठी भरगोस निधी उपलब्ध करुन दिल्याने आमदार बोदकुरवार यांचे  मारेगाव नगर पंचायतच्या नगर उपाध्यक्षा हर्षां महाकुलकर यांनी आभार मानले. 
नगर उपाध्यक्षा हर्षा अनुप महाकुलकर यांनी मानले आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांचे आभार नगर उपाध्यक्षा हर्षा अनुप महाकुलकर यांनी मानले आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांचे आभार Reviewed by सह्याद्री चौफेर on July 30, 2023 Rating: 5
Powered by Blogger.