टॉप बातम्या

पिडीत बालक पियुष माहुरे यांना तात्काळ आर्थिक मदत द्या; महावितरणच्या अन्यायाविरुद्ध लाठी येथील युवक एकवटले

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : महावितरणच्या गलथान कारभारामुळे जिवंत वीज तारेच्या स्पर्शाने लाठी येथील जखमी झालेल्या पियुष संभा माहुरे यांना तात्काळ आर्थिक नुकसान भरपाई मिळावी याकरिता लाठी ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर यांच्या उपस्थितीत उपअभियंता वणी यांना निवेदन देण्यात आले.

दिनांक 2 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता लाठी येथील 9 वर्षीय बालक गावातील बालकासोबत क्रिकेट खेळण्यासाठी गावा लगत असलेल्या शेतात गेले असता, दुपारी 3 वाजता विजेचे तार शेतात पडले होते. सदर जिवंत तार पडल्याचे लाठी येथील नंदू माहुरे यांनी आदल्या दिवशी म्हणजेच 1 मे 2023 ला विदयु्त कर्मचारी यांना दुरध्वनी द्वारे कळवले होते. तरी सुध्दा विद्युत कर्मचारी यांनी याकडे दुर्लक्ष केले. या जिवंत तारेला पियुष संभा माहुरे यांचा स्पर्श झाल्यामुळे त्या बालकांचे हात आणि पाय संपूर्ण भाजल्या गेले आहे. सदर बालकावर लातूर येथे उपचार सुरू आहे.

तूर्तास दिवसेंदिवस या बालकावर लाखो रुपयांचा खर्च घरातील आई वडीलाकडून होत आहे. मात्र,महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ वणी च्या वतीने आजपर्यंत कुठलीही मदत सदर पिडीत बालकाला प्राप्त झाली नाही. या दरम्यान,यवतमाळ येथील विद्युत निरीक्षकांनी पंचनामा करून दिवसेंदिवस उलटून गेले आहे, तरी सुद्धा कुठलीही मदत पियुष संभा माहुरे यांना मिळाली नाही. त्याचसोबत विद्युत कर्मचाऱ्यावर कुठलीही कार्यवाही विद्युत मंडळाकडून झाली नाही. त्यामुळे पियुष माहुरे या पिडीत बालकाला तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी व कर्तव्यात कसूर करणाऱ्या विद्युत कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी घेऊन लाठी येथील नागरिकांनी सदर मागणीला गंभीर स्वरूपात घेऊन येणाऱ्या 7 दिवसात नुकसान भरपाई न दिल्यास महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ वणी कार्यालयालासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल अशा ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी पोलीस पाटील संजीवनी खिरटकर, राजू पिंपळकर, संजय चिंचोळकर, संदीप गोहोकार, धीरज भोयर, मुकेश खिरटकर, नथ्थु बोधे, गणेश माहुरे, निलेश करडे, दीपक मोते, जयंत मत्ते, सुजित बोबडे, भुपेश लाडे, आशिष माहुरे, तोषक गावंडे, यश लांडगे, कुणाल बलकी, ईश्वर माहुरे, प्रमोद खिरटकर, यश धोबे, सागर डवरे इत्यादी उपस्थित होते.
Previous Post Next Post