एस.पी.एम कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के, तर कला शाखेचा निकाल 55 टक्के

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : नुकताच 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात एस पी एम कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल लागला तर कला शाखेचा निकाल 54.83 टक्के लागला.

यात विज्ञान शाखेतील एकूण 168 पैकी 168 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर कला शाखेतील एकूण 93 पैकी 51 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात आयुष वसंत ठाकरे हा 510 गुण (85 टक्के) घेऊन विज्ञान शाखेतून प्रथम आला.कु प्रांजली अविनाश परसावार हिला 497 गुण (82.83 टक्के) घेऊन दुसरी आली, तर झेम परवेज शेख हा 471 (78.50 टक्के) घेऊन तिसरा आला.

कला शाखेतून कु नंदिनी ऋषी रायपुरे ही 469 (78.17 टक्के) गुण घेऊन कला शाखेतून प्रथम आली, तर कु सानिया गणेश उईके 458 (76.3 टक्के) गुण घेऊन दुसरी आली,तर कु नंदिनी रवींद्र वांढरे 367 (61.17 टक्के) गुण घेऊन तिसरी आली.

या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे उपाध्यक्ष श्री रमेश बोहरा सचिव श्री लक्ष्मण भेदी सहसचिव श्री अशोक सोनटक्के प्राचार्य श्री क्षीरसागर सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
एस.पी.एम कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के, तर कला शाखेचा निकाल 55 टक्के एस.पी.एम कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के, तर कला शाखेचा निकाल 55 टक्के Reviewed by सह्याद्री चौफेर on May 26, 2023 Rating: 5
Powered by Blogger.