Top News

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या एकजुटीचा विजय; पत्रकारांना धमकी देणाऱ्या व्यक्तीने मागितली माफी


सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के 

उमरखेड : पत्रकारांना धमकी देणारे ओमप्रकाश मुडे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड व पदाधिकारी आणि बिटरगाव पोलीस ठाणेचे ठाणेदार श्री भोस यांच्या समक्ष माफी मागितली असून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या कोणत्याही पत्रकारांना यापुढे अपशब्द वापरणार नाही असे माफीनामा पत्र लिहून दिले असून संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे यांना फोनवर संपर्क साधून यापुढे आपल्या संघटनेच्या कोणत्याही पत्रकारांना अपशब्द वापरणार नसल्याचे सांगितले आहे.

  दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार मैनुद्दीन सौदागर यांना ओम प्रकाश मुडे नामक व्यक्तीने माझ्या वडिलांच्या विरोधात बातमी का प्रसिद्ध केली म्हणून धमकी दिली होती. सदर व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ उमरखेड, ढाणकी, पोफळी, मारेगाव आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन आक्रमक भूमिका घेतली होती.
माफिनाम्यात म्हटले आहे की, मी ओमप्रकाश मुडे राहणार निंगणुर येथील रहिवाशी असून माझ्या वडिलांविरोधात दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्रात बातमी का प्रकाशित केली म्हणून मी दिनांक ७ मार्च २०२३ रोजी निंगणूर येथील पत्रकार मैनोद्दीन सौदागर यांना मी दारूच्या नशेत धमकी दिली होती . ही धमकी मी दारू पिऊन असताना माझ्याकडून चूक झाली त्याबद्दल मी ओमप्रकाश मुडे जाहिर माफी मागतो. यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही अशी ग्वाही देतो व माफीनामा लिहून देतो. असे माफीनामा मध्ये म्हटले आहे.

 पत्रकारांना दिलेल्या धमकी बद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अनील राठोड, उदय पुंडे, मैनोद्दीन सौदागर, संजय जाधव, अशोक गायकवाड, बंटी फुलकोंडवार, शैलेश कोरडे, मोहन कळमकर, संदेश कांबळे, सुनील ठाकरे, गजानन वानखेडे, सय्यद रजा, सिद्धार्थ दिवेकर, जिल्हा महिला अध्यक्षा अर्चना भोपळे, विवेक जळके, राजेश पिटलेवाड वसंता नरवाडे शेख इरफान, सविता घुंगरे भागवत काळे, ब्रह्मानंद मुनेश्वर, मारेगाव तालुका आदी पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
Previous Post Next Post