डॉक्टर लूटमार प्रकरण...अतिरिक्त पोलीस अधिक्षक पियुष जगताप यांची मारेगाव पोलीस ठाण्यात भेट


सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 
 
मारेगाव : डॉक्टरच्या डोक्यावर रिव्हालव्हर ताणून पोटाला चाकूचा धाक दाखवत अज्ञात लुटारूनी भररहदारीत एकूण चार लाख रुपये लुटले, या घटनेने तालुक्यात कमालीची खळबळ उडाली असून विविध चर्चेला उधाण आले असता या प्रकरणाचे धागेदोरे गवसण्यासाठी पोलीस पथक  जिल्ह्यालगत चार जिल्ह्यात तसेच परराज्याकडे रवाना झाले आहे. 

मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील दवाखान्यात बंगाली डॉ.हाजरा हे आपली खासगी प्रॅक्टिस आटोपून मारेगाव स्थित मंगलम पार्क येथील निवासस्थानी परतत असतांना मारेगाव करंजी या राज्य महामार्गावर चारचाकी वाहनाने आलेल्या चार अज्ञात इसमानी रिव्हालव्हर आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवित सोन्याचे ऐवज सह रोख रक्कम लुटून नेली, या धक्कादायक प्रकाराची मारेगाव पोलिसात तक्रार दाखल होताच तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली.

सदरील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन यवतमाळ अतिरिक्त पोलीस अधिक्षक पियुष जगताप यांनी मारेगाव पोलीस स्टेशन ला भेट देत तपास जलद गतीने हलविण्याच्या सूचना देत प्रकरणावर लक्ष केंद्रीत केले असून पोलीस प्रशासन त्या चार आरोपींचा चौफेर शोध वर्धा, चंद्रपूर, आदिलाबाद व नागपूर या जिल्ह्यात घेण्यासाठी रवाना झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष वेधले आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post