सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे
मारेगाव : तालुक्यातील वेगाव येथील जगन्नाथ महाराज संस्थान येथे जागतिक महिला दिनानिमित्त कायदेविषक जनजागृती शिबिर घेण्यात आले. यावेळी महिलांना विविध कायद्यांची माहिती देण्यात आली.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द डॉ. हर्षाली आस्वले होत्या. प्रमुख अतिथी म्हणून अभियंता आणि अधिवक्ता श्यामली वासाडे, प्रा. डॉ. विभा पोटदुखे, वेगाव च्या सरपंच उषा देरकर, अॅड. हुमेरा शरीफ, पोलीस जमादार संगीता दोरेवार उपस्थित होते.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडून संपुर्ण देशभरात हा कार्यक्रम आयोजीत करण्यात येत आहे. या अंतर्गत हा शिबिर आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मारेगाव न्यायालय चे न्यायाधिश निलेश वासाडे, अॅड. मेहमूद पठाण, अॅड. प्रयाग रामटेके, यांचेसह प्रमुख पाहुणे यांनी महिलांबाबत विविध कायदे,सामाजिक प्रश्न यावर सखोल मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित महिलांना कायदेविषक ज्ञानाचे छापील साहित्य, भेटवस्तु आणि अल्पउपहार वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. काजल शेख हिने तर आभार प्रदर्शन मेघा कोडपे हिने केले. यशस्वीतेसाठी अॅड. करिष्मा किन्हेकार, अॅड.रूनाली गाणार, न्यायालयीन कर्मचारी सूरज टेंबरे, सतीश पुंड, पांडुरंग वासाड, मोसिम शेख, पवन राऊत, चेतन गेडाम, जमादार भालचंद्र मांडवकर, अटार्णी विणेश मेश्राम यांनी परिश्रम घेतले.
विधी सेवा समितीचा उपक्रम: वेगाव येथे महिला दिन निमित्त कायदेविषक शिबिर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 10, 2023
Rating:
