टॉप बातम्या

याने मैत्रिणींशी संवाद केला, अनं त्याने पाडले दात..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सध्या दहावी चे पेपर सुरु आहेत. मारेगाव शहराच्या परीक्षा केंद्रावर ग्रामीण भागातील परीक्षार्थी येजा करित आहे. अशातच एक दहावीच्या परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या एका परीक्षार्थीला भर रस्त्यात दात गमावण्याची पाळी आली आहे. त्याचेवर उपचार सुरू असून,मैत्रिणींशी संवाद करणं त्याला महागात पडले अशी चर्चा आहे.

नयन प्रभाकर फुलभोगे असे पीडित विद्यार्थ्यांचे नाव आहे. हा परीक्षार्थी आदर्श हायस्कूल मध्ये परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी येजा करत होता. नेहमीप्रमाणे दि
15 मार्च रोजी तो इयत्ता दहावी भूमितीचा पेपर सोडवून पायदळ घरी परत येत असताना सुहास (१९) नामक युवकाने मारेगाव घोंसा रस्त्यावर त्याला अडवून "माझ्या मैत्रिणींशी सवांद का? केला". या प्रश्नाच्या उत्तरासाठी त्या परीक्षार्थीला मारहाण केली. या घटनेत परीक्षार्थीला दात गमवावे लागले असून या उपरही तिच्याशी बोलल्यास जीवे मारण्याची धमकी ही देऊन गेला. या प्रकरणी नयन चे वडील प्रभाकर फुलभोगे यांनी मारेगाव पोलिसात तक्रार दिली. 
Previous Post Next Post