अल्पवयीनचे अपहरण करित केले दुष्कर्म, आरोपीला अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्याच्या गावातील एका २८ वर्षीय मुलाने गावाबाहेर शौचालयाला गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

11 मार्च रोजी सायंकाळी मुलगी शौचासाठी गावाबाहेर गेली होती. यादरम्यान मुलाने 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला मोटारसायकलवरून वणी शहरात नेले. तेथून त्याने मुलीला खडकी येथील नातेवाइकाच्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. मात्र दुसऱ्याच दिवशी नातेवाईकांनी त्यांना घराबाहेर हाकलून दिले. त्यानंतर हा आरोपी अल्पवयीन मुलीला वणीच्या बसस्थानकावर सोडून निघून गेला. पीडित मुलगी वणीवरून कसे तरी तिच्या मोठ्या आईच्या सावर्ला या गावी पोहोचून आपला सोबत घडलेली घटना कथन केला.

या घटनेची माहिती अल्पवयीन मुलीच्या पालकांना फोनवरून देण्यात आली. पीडित अल्पवयीन मुलीच्या जबानीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून संदीप परसराम धुर्वे याला अटक केली.



Post a Comment

Previous Post Next Post