सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : येथील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौकात मागील ४० ते ५० वर्षा अगोदर सुरू असलेले पुरुष मुत्रीघर गेल्या एक ते दीड महिनाभरापासून कोणतीही जाहिरात न काढता नगर परिषदेकडून बंद करण्यात आले आहे.
ते पूर्ववत सुरू करण्यात यावे, अशी मागणी युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात निवेदनाद्वारे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना केली.
येथील नगर परिषदेकडून या मुत्रीघरासमोर कुलूप लावून आरोग्य विभागाच्या मागे असलेले नगर परिषदेचे मुत्रीघर वापरण्यात यावे, असे बोर्ड लावण्यात आले आहे. परंतु हे मुत्रीघर मुख्य बाजारपेठेपासून बऱ्याच अंतरावर आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग आपले दुकान सोडून तितक्या दूर जाऊ शकत नाही. शिवाय हे मुत्रीघर अनेक वर्षापासून याच ठिकाणी सुरू होते, बाहेरगावाहून शहरात येणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे बंद असलेल्या मुत्रीघराचे दुर्गंधी येत असल्याचे कारण देण्यात येत आहे. परंतु इतक्या वर्षांपासून नाही मग आताच ही दुर्गंधी येत आहे काय? जर दुर्गंधी येत असेल तर ते स्वच्छ करण्याचे काम हे नगर परिषदेचे आहे. अशी थेट तक्रार करण्यात आली आहे.
सदर ठिकाणी एक पाण्याची टाकी लावण्यात यावी, ही जनतेची मागणी आहे त्यामुळे या मागणीला मान देऊन येथील मुत्रीघर पूर्ववत करण्यात यावी याआठी अजिंक्य शेंडे, बबन केळकर, रविंद्र चिडे, सचिन जुनगरे, कमलेश खडसे, सुरज जाधव, गणेश आत्राम, संदिप गेडाम, भरत कुळसंगे, धृत येरणे, महेश चौधरी, रोहित बोबडे, अमोल धानोरकर, निखिल बोबडे, रमेश मेश्राम, राजु वाघमारे, किशोर ठाकरे, त्रिलोक डोहे, निखिल गट्टेवार यांच्यासह युवा सैनिक यांनी केली.