Top News

उद्या मारेगाव येथे महाआरोग्य शिबीर


सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे

मारेगाव : डॉ महेंद्र लोढा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने महाआरोग्य शिबीर तथा मोफत शस्त्रक्रिया व रक्तदान शिबीर दि.16 फेब्रु. रोज गुरुवारला नगरपंचायतचे पटांगणात 12 ते 4 या वेळात आयोजित केले आहे.

कार्यक्रमाचे उदघाटक खासदार बाळूभाऊ धानोरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार, तर प्रमुख अतिथी श्री नरेंद्र ठाकरे माजी सभापती कृ ऊ बा स मारेगाव, सौ अरुणाताई खंडाळकर माजी सदस्य जिप यवतमाळ हे असणार आहे.
अभिष्टचिंतन या निमित्ताने विविध तज्ञ् डॉक्टरांच्या मार्गदर्शनात संपन्न होत असलेल्या शिबिरात तालुक्यातील आरोग्यबाबत चिंतीत असलेल्या परिवारातील सदस्य, शेजारी, नातलग तसेच संबंधित व्यक्तीनी या महाशिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकप्रतिनिधी ग्राम सदस्य अंकुश माफूर, तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, समीर सैय्यद शहर अध्यक्ष युवक काँग्रेस यांनी केले.

या भव्य शिबिराला यशस्वी करण्यासाठी मारेगाव तालुक्यातील काँग्रेस कमिटी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post