टॉप बातम्या

"प्रयत्नांची शिकस्त करा".... मोहदा येथे कब बुलबुल मेळावा

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स व गाईड्स पंचायत समिती, वणी चे विद्यमाने 'प्रयत्नांची शिकस्त करा' ही टॅग लाईन घेवून तालुका स्तरीय कब बुलबुल मेळावा कार्यक्रम आज दि.१९ जानेवारी २०२३ ते २० जानेवारी २०२३ या कालावधीत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मोहदा येथे आयोजित केला आहे.
या दोन दिवशीय तालुका स्तरीय कब बुलबुल मेळाव्याचे उदघाटन सोहळा दि.१९ जाने. ला सकाळी ११. वाजता होणार असून बक्षीस वितरण व समारोप दि.२० जाने. ला दुपारी ३. वाजता होणार आहे. या आयोजित मेळाव्याला परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे असे, आवाहन जि प मुख्याध्यापक श्री सुनील लोनगाडगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विलास हर्षे व आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();