टॉप बातम्या

डिझेल च्या नादात गमावली लाख रुपयाची मोटारसायकल

सह्याद्री चौफेर | रवी घुमे 

मारेगाव : शहरात चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे प्रकार समोर येत आहे. अशातच डिझेल आणून देण्याचा बहानाकरून एका भामट्याने कैलास लक्ष्मण जुमनाके (वणी-मारेगाव बजरंगबली मंदिर परिसर) नामक इसमाची मोटारसायकल लांबवल्याचा घटना समोर आली.

काल दि.३० जानेवारी ला एका भामट्याने "तुला स्वस्त दरात ट्रॅक्टरसाठी डिझेल आणून देतो, तू पैसे दे म्हणत दुचाकी आणि सात हजार रुपये घेऊन गेला. मात्र मोटारसायकल भामटा, डिझेल आणि पैसे घेऊन गायब झाला. ही घटना दुपारी 1 वाजता च्या दरम्यान, घडली. माझ्या ओळखीचे खूप सारे जेसीबीवाले आहेत, दुचाकी वाहन धारकांना विश्वासात घेवून तुमी पैसे द्या मी डिझेल आणून देतो म्हणून पोबारा केला आहे. कैलास यांनी बराच वेळ त्याची वाट बघितली परंतु भामटा आलाच नाही, दुचाकी चा शोधही घेतला. मात्र मोटारसायकल कुठेही आढळून आली नसल्याने आपली फसगत झाल्याचे लक्षात घेत अखेर मारेगाव पोलीस स्टेशन गाठून या बाबत रीतसर तक्रार दाखल केली.

दुचाकी क्रमांक. एम. एच. 29 एच. बि आर. 8257 होंडा कंपनीची असून भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असता पुढील तपास मारेगाव पोलीस करित आहे. 
Previous Post Next Post