टॉप बातम्या

वणी वाहतूक शाखेतर्फे जनजागृती मोहीम

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : रस्ते सुरक्षा अभियानातंर्गत वणी पोलिस स्टेशन व वाहतूक शाखेच्या वतीने पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या नेतृत्वात शहरातील प्रमुख मार्गाने ही रॅली काढण्यात आली.

वणी वाहतूक शाखेच्या माध्यमातून शहरात ११ ते १७ जानेवारी पर्यंत सुरक्षा सप्ताह राबविला जात आहे. वाहन चालकांनी वाहने चालवितांना सुरक्षेचा उपाय म्हणून सिटबेल्ट व हेलमेटचा वापर करावा, हा संदेश वाहन चालकांपर्यंत पोहचविण्याकरिता वाहतूक शाखेने शहरातून हेलमेट बाईक रॅली काढली. यात शहर पोलिस व वाहतूक पोलिसांनी मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभाग दर्शविला.
या सुरक्षा सप्ताहात शहर पोलीस व वाहतूक पोलिसांनी सहभाग घेत हेलमेट घालून बाईक चालविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या सप्ताहाच्या निमित्ताने शहरात सुरक्षेचे उपाय व नियम दर्शविणारे होल्डिंग्स लावण्यात आले.
जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधिक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या रस्ते सुरक्षा अभियानातंर्गत वणी पोलिस स्टेशन व वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजय आत्राम, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण हिरे, आशिष झिमटे, माधव शिंदे, एपीआय माया चाटसे यांनी या रॅलीमध्ये सहभाग दर्शविला. तसेच टीडीआरएफ चे कर्मचारी देखिल या रॅलीत सहभागी झाले होते. 


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();