सह्याद्री चौफेर | लखन लोंढे
महागाव : तालुक्यातील प्रमुख समस्या विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे साहेब यांना अमरावती येथे चर्चेदरम्यान कळवल्या महागाव तालुक्यातील प्रमुख महत्वाच्या कार्यालयाच्या प्रमुख पदी दोन वर्षापासून प्रभारी अधिकारी नेमण्यात आल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने या प्रभारी अधिकाऱ्यांच्या जागेवर कायमस्वरूपी व अनुभवी अधिकारी नेमण्याची मागणी जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांनी अमरावती विभागीय आयुक्तांची भेट घेऊन मागणी केली आहे.
महागाव तालुक्यातील तहसिलदार,पोलीस स्टेशन, तालुका आरोग्य अधिकारी, उपअधीक्षक भुमीअभिलेख, पाटबंधारे उपविभाग,जि.प.बांधकाम उपविभाग,एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, नगर पंचायत मुख्याधिकारी यांसारख्या महत्वपुर्ण आठ कार्यालयाच्या प्रमुख पदाचा त्याच काही कार्यालयातील कनिष्ठ किंवा लगतच्या तालुक्यातील अधिकाऱ्यांकडे प्रभार देण्यात आला असुन या अधिकाऱ्यांचा कामकाजातील कमी असलेला अनुभव व काम करण्याची उदासीनता यांमुळे अनेक विकासात्मक कामांमध्ये अडचणी निर्माण होत असुन कामे वेळेवर होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. तसेच या अधिकाऱ्यांच्या प्रभारी कारभारामुळे तालुक्याचा विकास खुंटून तालुका विकासाच्या दृष्टीने माघारला आहे.
प्रभारी राजामुळे त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कोणताच अंकुश अधिकाऱ्यांनचा नसल्याने नागरिकांची अडवणुक करून त्यांची आर्थिक लुट करण्याचे प्रमाणअधिक प्रमाणात वाढले आहे.ही अडवणुक व लुट थांबविण्यासाठी प्रभारी अधिकारी असलेल्या कार्यालयाच्या प्रमुख पदावर कायमस्वरूपी अधिकारी नेमण्यात यावे.
महागाव शहरातील ग्रामीण रुग्णालय तयार होवुन चार वर्षा पासुन अनावरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या इमारतीमध्ये तत्काळ ग्रामीण रुग्णालय सुरु करून नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा २५ जानेवारी पासुन विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तालुका सरपंच संघटना,रिटायर्ड मिल्ट्रीमॅन संघटनेसह आमरण उपोषण करण्याचा ईशारा या अगोदर निवेदनाद्वारे जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी दिला आहे.
बॉक्सतुमच्या तालुक्याला कायमस्वरूपी तहसीलदार लवकर देऊ, व तालुक्यातील ज्या कार्यालयात प्रभारी अधिकारी आहे त्या कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी देण्यात येईल असे आश्वासन विभागीय आयुक्त श्री दिलीपजी पांढरपट्टे साहेब यांनी भेटीदरम्यान जगदीश भाऊ नरवाडे यांना दीला.24 तारखेच्या अगोदर कायमस्वरूपी तहसीलदार न आल्यास 25 तारखेला विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे ठीया आंदोलन करणार - जगदीश भाऊ नरवाडे