सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार
सावली : पंचायत समिती सावलीच्या शिक्षण विभागा अंतर्गत 50 वी तालुकास्तरीय विज्ञान व शैक्षणिक प्रदर्शनी नवभारत विद्यालय, अंतरगाव येथे दिनांक 17 ते 19 जानेवारी 2023 संपन्न होत आहे. दिनांक 17 जानेवारी 2023 ला श्री. मा परिक्षीत पाटील तहसिलदार सावली यांचे हस्ते विज्ञान प्रदर्शनीच उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष म्हणून मा. श्री. आशिष बोरकर सहा. पोलीस निरीक्षक पो.स्टे. सावली उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. छगणजी उंदिरवाडे पो.पा. अंतरगांव श्री. लोमेशजी श्रीकोंडावार पो.पा. महाबुज, श्री. गोकुळ कावळे पो.पा. गायडोंगरी श्री. महेंद्रजी ठाकरे उपाध्यक्ष शि.पा.सं. श्री. शिशुपाल ठाकरे अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ, श्री. श्रीरंग कुमरे श्रीमती सध्या कोनपत्तीवार शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक उपस्थित होते.
श्री लोकेशजी खंडारे गटशिक्षणाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अजय कांडेकर मु. अ. न.भा. वि. अंतरगांव व सर्व शिक्षकांनी अतिशय सुंदर असे नियोजन केले होते. तालुक्यातील सर्व माध्यमाच्या जि.प. व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला, त्यामध्ये उच्च प्राथमिक गट वर्ग 6 ते 8 च्या 38 प्रतिकृती तर माध्यमिक गट वर्ग 9 ते 12 च्या 22 प्रतिकृती प्रदर्शनात ठेवण्यात आल्या.
मा. तहसिलदार साहेब पानी वैज्ञानिक दृष्टीकोन दैनंदिन जीवनात अंगीकार करून स्पर्धा परीक्षा करीता विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा असे सांगितले. मा. ठाणेदार साहेब यांनी हेल्मेट हा सुध्दा विज्ञानाचा अविष्कार आहे. त्यामुळे वाहने चालवितांना नेहमी हेल्मेटचा वापर करावा या करीता आपल्या पालकांना समजावून सांगावे असे प्रतिपादन केले. तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष यांनी मानवी मुल्ये व विज्ञान याची विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सांगड घालावी असे मत मांडले.
श्री लोकेशजी खंडारे गटशिक्षणाधिकारी आपल्या प्रास्ताविकेतून विज्ञानवादी दृष्टीकोन वाढविण्याच्या संदर्भाने मार्गदर्शन केले तसेच विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन आयोजीत करण्याचे महत्व विषद केले..
कार्यक्रमाचे संचालन श्री. उमरे सर यानी केले तर आभार श्री. चौधरी सर यांनी व्यक्त केले या प्रसंगी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक विज्ञान शिक्षक, विद्यार्थी व गावकरी मंडळी उपस्थित होते.