टॉप बातम्या

पाथ्रड देवी जि.प.शाळेला क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद


सह्याद्री चौफेर | चेतन पवार 

दारव्हा : खेळ व क्रीडा संवर्धन मंडळ पंचायत समिती दारव्हा अंतर्गत जिल्हा परिषद शाळा साजेगाव येथे घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय क्रीडा सामन्यात, जिल्हा परिषद शाळा पाथ्रड देवी येथील विद्यार्थ्यांनी संपूर्ण खेळात आपल्या क्रीडा कौशल्याचा रुबाब दाखवत सहभाग नोंदविला.
तालुका स्तरिय क्रिडास्पर्धेत शो ड्रिल, कबड्डी, खो- खो, लंगडी, बॅडमिंटन, टेनीक्वाईट, रीले, २०० मिटर, १०० मिटर धावणे, गोळा फेक, थाळीफेक, कॅरम, चेस, लांब ऊडी इत्यादी क्रीडा प्रकार दोन गटात खेळवण्यात आले. सदर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील दहा केंद्रातील बहुतांश शाळांनी सहभाग नोंदविला होता. तीन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा पाथ्रड देवी येथील विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत कबड्डी, खो- खो, लंगडी, गोळा फेक, लांब उडी, रिले, १०० मिटर धावणे, २०० मीटर धावणे इत्यादी क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपद प्राप्त केले. तर इतर चार क्रीडा प्रकारात पाथ्रड देवी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उपविजेतेपद पटकाविले.

विविध खेळातील उत्कृष्ट क्रीडा प्रदर्शन पाहता आयोजकांनी जिल्हा परिषद शाळा पाथ्रड देवीच्या विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेची चॅम्पियनशिप बहाल केली. चमू शिक्षक पारवेकर सर, घोडाम सर, खोकले सर, शिक्षिका गुल्हाने मॅडम, चौकडे सर, खांदवे सर व शाळेचे मुख्याध्यापीका रोहनकर मॅडम, केंद्रप्रमुख ओंकार राठोड सर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांची सर्व क्रीडा प्रकाराची तयारी करुन घेण्यात आली.
या तालुकास्तरीय क्रीडा सामन्यात उत्कृष्ट क्रीडा प्रदर्शन करत चॅम्पियनशिप मिळविल्याबाबत शाळेत विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा घेण्यात आला. या प्रसंगी जामणी येथील सर्व गावकरी व पालक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();