सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख
कळंब : कळंब शहरातील हलबी पुरा येथील रहिवासी एका युवकाचा खून करण्यात आला. अश्विन उर्फ बबलू राऊत (वय २५) असे मृतकाचे नाव आहे.
मृतक हा दिनांक १६ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान, इंदिरा चौकात येथे उभा असताना अज्ञात चार युवकांनी अचानक हल्ला करून अश्वीन उर्फ बबलू राऊत याला हातोडीने डोक्यावर तसेच पोटात व छाती वर धारदार शस्त्राने गंभीर घाव घालून आरोपी पसार झाले.
मृतक हा इंदिरा चौकात गंभीर जखमी अवस्थेत असताना नागरिकांनी अश्विन याला शासकीय रुग्णालयात नेले, दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सदर खून हा पुर्व वैमन्यशातुन झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडुन मिळाली. आज (दि.१७ जाने.) रोजी या खुन प्रकरणामध्ये दोन बालके अंतरगांव (पालोती) वरून व दोन बालके वर्धा येथुन पोलीसांनी ताब्यात घेतले. हे चारही बालके विधीसंघर्षग्रस्त असल्याचे समजते.
पुढील तपास जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ पवन बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.