टॉप बातम्या

विना हर्रास घाटात रेतीचा उपसा....

सह्याद्री न्यूज | रवी घुमे 

मारेगाव : तालुक्यात अवैध रेती साठयासह अवैध रेती तस्करी करणार्‍यांचे प्रमाण वाढले असून विना हर्रास घाटात राजरोसपणे रेतीची तस्करी केली जात आहे.

आर्थिक आवक मंदावल्याने रेती तस्करांनी आता नवीनच शक्कल लढवून सभोताल जासूस गस्ती वर ठेवून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रेती चोरी करून काळ्या बाजारात विकण्याचा गोरखधंदा सुरू केल्याचे परिसरात निदर्शनास येत आहे.     
तालुक्यातील एकाही रेती घाटांचे लिलाव झालेले नसून याचा विपरीत परिणाम बांधकाम उद्योगांवर झालेला असून रेती मिळणे कठीण झालेले आहे. ही बाब लक्षात घेवून रेती तस्करांनी अवैध मार्गाने रेती साठा साठवून ठेवला असून, पाहिजेत त्या बांधकामावर वाळू पुरवली जात आहे. तसेच नेमलेले खबरी दिवसभर परिसरात भ्रमंती करून संबंधितावर लक्ष ठेवून असतात. त्यामुळे सहज प्रशासनाची कारवाई अपयशी ठरत असल्याचे बोलल्या जात आहेत. 
मारेगाव तालुक्यातील कोसारा, आपटी, शिवणी येथील नदी घाटातून दिवसाढवळ्या व रात्रीच्या वेळेस राजरोसपणे रेतीची वाहतूक होत आहे. तस्करी करणाऱ्या रेती तस्कराकडून विना नंबर प्लेट चे ट्रक्टर ने वाहतूक होत असताना संबंधित विभाग गप्प का बसला. मुख्य मार्गावरून रेतीची वाहतूक होत असताना गस्त धारी खाकी कारवाई का करित नाही. असा संशय सामान्य नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे,या फुकटाच्या अवैध धंदयात अनेकांनी राजकीय पदाचा आसरा घेत मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो या नादात अनेक जण "मै झूकेगा नही" म्हणत या व्यवसायात 'पुष्पा' होऊ पाहत आहे. या संदर्भात गावपातळीवरील रात्रीच्या भरधाव वाहतुकीची तक्रारी असून लोकांची रात्रीची झोपेमोड होत असून शेत शिवारातील उभ्या पिकांचे नासधूस करित असल्याची ओरड आहे. अशा प्रकारे रेतीची चोरी करणारे कुणी एक व्यक्ती नसून हे टोळीचे काम असले पाहिजे, किंबहुना रेती तस्करीत शासनाची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात असून याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहे. तूर्तास रेती चोरी होण्याचे प्रमाण वाढत असून पोलिस, स्थानिक प्रशासनाने या सर्व प्रकरणाचा छडा लावण्याचे रात्र सोडू दिवसाला शर्तीचे प्रयत्न केले जात आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();