टॉप बातम्या

रक्तरंजित: 16 दिवसात 10 खून; सोमवारी दोन हत्यांनी जिल्हा हदरला


सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

यवतमाळ : जिल्ह्यासाठी नवीन वर्ष रक्तरंजित ठरतेय. गेल्या १६ दिवसात जिल्ह्यात खुनाच्या १० घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर 'क्राईम रेट' कमी करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

दर दिवसाआड एक खून होत आहे. कळंब आणि राळेगाव तालुक्यात सोमवारी एकाच दिवशी दोघांचा खून करण्यात आल्याने जिल्ह्यात कायदा व सुरक्षा व्यवस्था आहे की नाही, असा प्रश्न निर्माण केला जात आहे.

राळेगाव तालुक्यातील कळमनेर येथे शेतात जागलीला गेलेल्या शेतकऱ्याचा अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात दगडी वरवंटा घालून खून केला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. तर कळंब तालुक्यातील सोमवारी रात्री ८.३० वाजता इंदिरा चौकात युवकाची हत्या करण्यात आली.

अशोक धनंजय अक्कलवार (६५) रा. शांतीनगर, ता. राळेगाव आणि अश्विन राऊत (२४) रा हलबीपुरा, कळंब अशी मृतांची नावे आहेत.

दर दिवसाआड एक खून

जिल्ह्यात १६ दिवसात १० खून झाल्याने गेल्यावर्षीचा रेकॉर्ड यावर्षी यावर्षी मोडला जाईल. अशी चर्चा आहे. गेल्या वर्षी खुनाची शंभरी जिल्ह्यात गाठली होती. यावर्षी नवीन वर्षाची सुरुवातच रक्तरंजित झाली आहे. सर्वाधिक खून यवतमाळ शहरात झाले आहेत. यवतमाळनजीक वाघापूर येथे पतीने दारूच्या नशेत पत्नीचा खून केला. यवतमाळात जागेच्या वादातून पुतण्याने काका व चुलत भावाची हत्या केली. गुन्हेगारी वर्तुळातील वर्चस्वाच्या वादातून गेल्या आठवड्यात मांसविक्रेत्या तरुणाचा खून करण्यात आला. कळंब तालुक्यातील जागलीसाठी गेलेल्या दाम्पत्याचा वाद होऊन पतीने पत्नीचा खून करून मृतदेह पेटत्या शेकोटीत फेकला होता. लाडखेड पोलीस ठण्यांतर्गत पतीने पत्नीचा खून केला. बाभुळगाव तालुक्यातील दाभा येथे सावत्र वाडीलाने आठ वर्षाच्या मुलास ठार मारले. सोमवारी दोन खून झाले. संशय, वर्चस्व, कौटुंबिक वाद, आदी कारणांतून खुनांच्या घटना वाढल्याने निरीक्षण पोलिसांनी नोंदवले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();