टॉप बातम्या

"त्या" खडकी फाट्याजवळ घडलेल्या अपघातातील दुसराही "देवाघरी"


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : भरधाव दुचाकी उभ्या ट्रक वर आदळली. त्यात दुचाकी स्वार चालक हा जागीच ठार झाला तर दुसरा हा गंभीर जखमी असल्याने मारेगाव वरून चंद्रपूरला उपचारार्थ जात असतांना वाटेतच त्याने प्राण सोडले. ही घटना आज गुरुवारी सायंकाळी मारेगाव महामार्गांवरील खडकी फाट्यानजीक घडली होती.

हरिदास लक्ष्मण टेकाम (30) (सालईपोड) हा जागीच ठार झाला. तर रामकिसन टेकाम (35) हा गंभीर जखमी झाला असून त्याला मारेगाव येथे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले असता वणी येथील चिखलगाव रेल्वे फाटकपर्यंत पोहताच रामकिसन याने अखेरचा श्वास घेतला. 

सूत्राच्या माहिती नुसार हे दोघेही सख्खे चुलत भाऊ आपली दुचाकीने गावी परत येत असतांना खडकी फाट्यावर ना दुरुस्त उभ्या ट्रक ला जबर धडक दिल्याने हरिदास हा जागीच ठार झाला, तर रामकिसन हा गंभीर जखमी झाले होते. याला पुढील उपचारासाठी जात असतांना वाटेत त्याची प्राणज्योत मालवली.  

सामाजिक कार्यकर्ते तथा जय भीम उत्सव समिती चे अध्यक्ष हेमंत नरांजे अपघातग्रस्तांच्या मदतीला सदैव धावत असतात, हेच कार्य त्यांनी आजही केले. जखमीला मारेगाव वरून चंद्रपूर येथे उपचारासाठी निघाले मात्र, अपघात ग्रस्ताने वाटेतच प्राण सोडला असून त्याला ग्रामीण रुग्णालय वणी येथे दाखल केले असे त्यांनी सांगितले. या बाबत आणखी बोलतांना ते म्हणाले की,रस्त्यावर उभे ट्रक असतात परंतु उभे ट्रक वाहन धारक कोणतेच फलक किंबहुना रिफ्लेक्टर कडे दुर्लक्ष करतात त्यामुळे वाहतूक धारकांना अंधारात काहीच दिसत नाही म्हणून असे अपघात घडतात. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();