सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार
सावली : राष्ट्रीय महामार्गा क्र 930 चंद्रपूर–गडचिरोली महामार्गावर सायंकाळीं सहा वाजताच्या दरम्यान व्याहाड बुज येथे नंदिनी बार जवळ दुचाकीची उभ्या ट्रॅक्टर ला जबर धडक झाली. यात दुचाकीस्वार चालक जागीच ठार झाला. दुचाकी चालकाचे नाव खुशाल वासेकर असे असून हा व्याहाड बुज येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
वृत्त लिहेपर्यंत घटना स्थळावर कुणीही पोलिस कर्मचारी आलेले नाही. या महामार्गावर नेहमीच अशा घटना घडत असतात त्याकडे प्रशासन लक्ष देतील काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.