टॉप बातम्या

एस. पी. एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथी संपन्न


सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वणी येथे अंधश्रद्धा आणि अस्वच्छता यांनी बुरसटलेल्या समाजाला किर्तनासारख्या माध्यमाने समाज सुधारणा करणारे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची आज विद्यालयात पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व वर्ग खोल्या व आसपासचा प्रदेश स्वच्छ केला. या स्वच्छता अभियानात शाळेतील शिक्षक सुद्धा सहभागी झाले होते, यानंतर संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर व उपमुख्याध्यापक श्री तामगाडगे सर यांनी पूजन करून माल्यार्पण केले.

यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते, सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();