टॉप बातम्या

गोडावून मधून दीड लाखांचा कापूस पळवीला

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

मुकुटबन : गेल्या काही दिवसापासून या परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे.

मुकुटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सुरदेवी शेत शिवारातून अज्ञात चोरट्यांनी शेतात शिरून 20 क्विंटल कापूस लंपास केला.

झरी तालुक्यातील बोपापूर येथील रहिवाशी रवी प्रभाकर ढेंगळे यांचे सुरदेवी शिवारात शेत आहे. ढेंगळे यांनी त्यांच्या शेतात निघालेल्या कापूस शेतातीलच गोडावून मध्ये ठेवला होता. 26 डिसेंबर च्या सायंकाळी अज्ञात चोरट्यांनी हे गोडावून फोडून दीड लाख रुपये किमतीचा 20 क्विंटल कापूस लंपास केला.

याबाबत रीतसर मुकुटबन पोलीस स्टेशन ला तक्रार देण्यात आली असून, पुढील तपास मुकुटबन पोलीस करित आहे. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();