टॉप बातम्या

एस. पी. एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कायदेविषयक साक्षरता शिबीर

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : शिक्षण प्रसार मंडळ विद्यालय व महाविद्यालयात तालुका विधी सेवा समिती वणी तर्फे दि. १४ डिसेंबर रोजी विद्यालयात कायदे विषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर अध्यक्ष स्थानी होते तर विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री तामगाडगे सर प्रमुख होते, यावेळी प्रमुख अतिथी वणी चे न्यायाधीश श्री सुधीर बोमिडवार उपस्थित होते. यावेळी बोमिडवार साहेबानी विद्यार्थिनीना कायदे विषयक मार्गदर्शन केले तसेच पोक्सो कायद्याविषयी माहिती दिली, तसचे स्वतःचे संरक्षण कसे करावे समाजातील घातक प्रवृतीला बळी पडू नये,याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री बुजोने सर यांनी मानले. यावेळी सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();