टॉप बातम्या

मैत्री कट्टा तर्फे महिलांकरिता खास आगळी मोफत संधी

सह्याद्री चौफेर | रवी घुमे 

मारेगाव : भारतीय संस्कृतीचं प्रतीक असलेला ढोलताशा ची कमान आता महिलांनीही हाती घेतल्याच दृश्य अलीकडे मोठमोठ्या महानगरात बघावयास मिळते.

मारेगावातही महिलांना असंच हक्काचं व्यासपीठ मिळावं ह्या उदात्त हेतू ने मारेगांव मैत्री कट्टा गृप ने महिलांचा ढोलताशा पथक तयार करण्याचं मानस दाखवत नव्या वर्षात हिरकणी ढोलताशा पथक तयार करण्याचं ठरवलं. यात होतकरू हौशी निवडक तरुणी, महिलांना विशेष प्रशिक्षण देऊन तयार करण्यात येणार आहे आणि तेही मोफत.
 मारेगावात प्रथमच ही आगळी संधी उपलब्ध होत असतांना हौशी महिलांनी या संधीचं सोनं करण्याची गरज निर्माण झाली आहे. मोजक्याच रिक्त जागेसाठी इच्छुक महिलांनी ह्या संधीचा लाभ घेण्याकरिता खालील क्रमांकावर संपर्क साधून आपले नाव नोंदवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दिपक जुनेजा - 8830897245
उदय रायपुरे - 7020615358
बिना दुपारे - 9356035463
प्रतिभा डाखरे - 8999515506
मीरा दुपारे - 9850197557
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();