सुशिक्षित बेरोजगार व कुशल अकुशल कामगारांना कंपनीत कामावर घ्या.. अन्यथा चक्काजाम आंदोलन करु - काँग्रेस नेते संजय खाडे यांचा ईशारा
सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
उकणी गावातील वेकोली वणी नॉर्थ एरिया व वणी या एरियासाठी उकणी ओपनकास्ट माईन्स तसेच निलजई ओपनकास्ट माईन्स आहे. तेव्हा वेकोलीने कोळसा खानीमध्ये कोळसा काढणे व डम्पिंग करण्यासाठी ९० टक्के जमीन संपादित केली त्यामुळे या गावात जो पारंपारिक शेती व्यवसाय होता तो शेती व्यवसाय पूर्ण बंद झाला असून, फक्त उर्वरित १० टक्के असलेल्या जमीनीमध्ये शेतकरी पीक पेरणी करून आहे तर याच परिसरात गेल्या एक महिन्यापासुन नरभक्षी वाघाची मोठ्या प्रमाणात दहशत असून वाघाने तालुक्यातील दोन व्यक्तीला ठार मारले. त्यात अनेक जनावरांना सुद्धा जखमी केले आहे. त्यामुळे शेती व्यवसाय पूर्णतः धोक्यात आला आहे.
आज शेतात कोणताही मजूर वाघाच्या दहशतीमुळे जाण्यास तयार नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर सुद्धा उपासमारीची पाळी आली आहे व शेतीवर अवलंबून असलेले शेतमजूर यांच्यावर सुद्धा उपासमारीची पाळी आली आहे त्यामुळे या गावात सुशिक्षित व कुशल व अकुशल युवकांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे गावातील व परिसरातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात चोरी नशा व इतर वाममार्गाला लागण्याची दाट शक्यता आहे त्यातच बेरोजगारीचा प्रश्न जर वेळेतच रोखला नाही तर मोठा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काँग्रेस नेते संजय खाडे यांनी ईगल प्रा. लि. कंपनीकडे तीन मागण्या केल्या त्या खालील प्रमाणे :
१) उकणी गावातील सर्वच्या सर्व सुशिक्षित कुशल व अकुशल कामगारांना तात्काळ आपले कंपनीत नोकरीवर ठेवून कमीत कमी २०० बेरोजगारांना कंपनीत सामावून घेण्यात यावे.२) उकणी सहित पिंपळगाव,लाटी बेसा, निवली,तरोडा, निलजई, बेलोरा, बोरगाव, कोलारपिंपरी, जुनाड, निळापुर, ब्राह्मणी, मुंगोली, या परिसरातील बेरोजगारांना ज्या ज्या कोळसाखानीमध्ये खाजगी कंपन्या आहेत तेथे त्यांना ८० टक्के प्राधान्य देऊन नोकरी देण्यात यावी.३) उकणी गावातील व परिसरातील ज्या युवकांच्या जवळ हेवी ड्रायव्हिंग लायसन्स आहे त्यांना आपल्या कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून नोकरी देण्यात यावी तसेच ज्यांच्याकडे हेवी लायसन्स असून सुद्धा वाळू ट्रक चालवता येत नाही अशांना आपल्या कंपनीमार्फत कमीत कमी स्वतंत्र कॅम्प घेऊन त्या परिसरातील लायसन्स धारक युवकांना ट्रेनिंग देऊन त्यांना ट्रेन करण्यात यावे वरील तीनही महत्वपूर्ण मागण्या केल्या आहे.
स्थानिक युवकांना आपल्या कंपनीमध्ये येत्या दहा दिवसाच्या आत नोकरी देण्यात यावी, अन्यथा यानंतर कोणतीही नोटीस न देता दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोज बुधवार ला सकाळी आपल्या कंपनीच्या वॉल्वोची ओबी डम्पिंग तसेच खदान बंद आंदोलन व बोरगाव फाटा येथे बेरोजगार युवकांना घेवुन चक्काजाम आंदोलन केल्या जाईल यानंतर उद्भवणाऱ्या गंभीर परिस्थितीला आपली कंपनी वेकोली प्रशासन व स्थानिक तालुका व जिल्हा प्रशासन तेवढेच जबाबदार राहील असा ईशारा सुध्दा दिला आहे.
तर निवेदनाच्या प्रतिलिपी चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारी यवतमाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ, अध्यक्ष सहप्रबंधक निदेशक वेकोली मुख्यालय नागपूर, उपविभागीय अधिकारी वणी उपविभागीय, पोलीस अधिकारी वणी, माननीय तहसीलदार वणी, मुख्य क्षेत्रीय महाप्रबंधक भालर वसाहत, माननीय उपक्षेत्रीय प्रबंधक उकणी ठाणेदार शिरपूर यांना यांच्या प्रतिलिपी देण्यात आल्या.
यावेळी माजी सरपंच तथा काँग्रेस नेते संजय खाडे यांच्यासह नारायण मांडवकर, विलास शेरकि, प्रा.टोंगे, बाळासाहेब राजुरकर, राजु घाडे, विठ्ठल खोब्रागडे, निकेश निब्रड, शुभम चिंचोलकर, देविदास चिंचोलकर, जिवन मजगवळी, नत्त्थु पारशिवे, सुधाकर दर्वेकर, अशोक राजपुत, रविद्र जुनगरी. पांडुरंग धाडे, अविनाश मोडक, विजय लोखडे, बाळा शिंदे, प्रविण डोंगे, संतोष घाडे, मनोज खाडे आदी उपस्थित होते.
सुशिक्षित बेरोजगार व कुशल अकुशल कामगारांना कंपनीत कामावर घ्या.. अन्यथा चक्काजाम आंदोलन करु - काँग्रेस नेते संजय खाडे यांचा ईशारा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 11, 2022
Rating:
