सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार
सावली : सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक २०२२ शेवटच्या दिवशी बोथली ग्रामपंचायत करिता सरपंच पदाकरीता एकूण ०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर सदस्य पदाकरीता ३० उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
बोथली हे गाव लोकनेते राज्यमंत्री स्वर्गीय वामनराव पाटिल गड्डमवार यांचे मूळ गाव आहे. त्यामुळे बोथली ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. सरपंच पदासाठी थेट निवडणूक असताना सर्वसाधारण गटासाठी हे आरक्षण असल्याने सर्वच पक्षामध्ये अधिकच चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोण कोणावर भारी पडतो हे येणाऱ्या १८ डिसेंबरला होणार्या निवडणुकीत व २० डिसेंबरला पार पडणाऱ्या निकालानंतर कळणार आहे.