सस्नेह नमस्कार !
तालुक्यातील सर्व सामाजिक, राजकीय, संस्था, व्यावसायिक, आप्तेष्ट, गुरुदेव प्रेमी आणि बंधू भगिनींना सांगताना मला खूप आनंद होतोय, की, माझ्या 'तृष्णा मेडिकल अँड जनरल स्टोअर्स' दुकानाच्या च्या रूपाने दि.16 नोव्हेंबर 2022 रोज बुधवारला भव्य उदघाट्न समारंभ, मार्डी येथे आयोजित केला आहेत. वेळ खूप कमी असल्यामुळे आपण सर्वापर्यंत येणं शक्य होणार नाही. म्हणून माझ्या छोट्याश्या, स्टोअर्स चे एक आग्रहाचे निमंत्रण या माध्यमातून आपणास कळविण्यात येत आहे.
एक स्वप्नं, जे उरी बाळगलं होतं.. ते आता प्रत्यक्षात येताना बघणे म्हणजे एक सोहळाच आहे. एक अपेक्षापूर्तीचा क्षण... एक खूप मोठा दिवस.. एक खूप मोठा प्रसंग.. आणि एक खूप मोठं पाऊल क्षितिजाच्या दिशेने! याचे साक्षीदार तुम्ही उपस्थित मान्यवर.
मोठ्या मनाने, माझ्या निमंत्रण पत्रिकेचा, मान ठेवत सस्नेहाची साथ द्यावी, नेहमीच उत्तमोत्तम कार्य सामाजिक जाणीवेतून होत असतं आता या माध्यमातून एक वेगळं माझ्याकडून व्हावं म्हणून प्रोत्साहन द्यावे.. तुमच्या सर्वांचा नेहमीच ऋणी राहिन मी.
या माझ्या आनंदाच्या क्षणी, तुमची उपस्थिती असणं खूप गरजेचं आहे.. तुमच्या शिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शक्णार नाही. अपूर्णच राहील ही घडी !
नेहमीच माझ्या सोबत आलात.. माझ्या या क्षणांतही माझी साथ द्याल असा विश्वास आहे.
आपणा सर्वांना हे आग्रहाचे निमंत्रण.. माझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी मनापासून विनंती करतो..
स्थळ :- शोभाई कॉम्प्लेक्स, मेन रोड मार्डी,ता. मारेगाव
वेळ : दुपारी 12 ते 4 वाजता (अल्पहार)
आपले विनीत : श्री मारोती माधवराव गौरकार, श्री गौरव मारोती गौरकार
संपर्क :- 9881557165/7743861206
आग्रहाचे निमंत्रण : तृष्णा मेडिकल अँड जनरल स्टोअर्स चा भव्य उदघाट्न समारंभ मार्डी येथे...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 14, 2022
Rating:
