लखन लोंढे | सह्याद्री चौफेर
महागांव : शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकावर गोंगलगाय प्रादुर्भाव संकट टळते ते न टळते,आणखी एक संकट उभे राहिले आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचे नुकसान होत आहे ते म्हणजे 'पिवळ्या मोझाक' चा प्रादुर्भाव.
तूर्तास शेतकऱ्याच्या वतीने शास्त्रज्ञाचे मार्गदर्शनाचे आयोजन करण्याची मागणी सन्मानिय नंदकुमार मस्के यांनी कृषी विभागाला केली होती. याची दखल तात्काळ कृषी विभागाने घेत थेट बांधावर कृषी शास्त्रज्ञ व कृषी अधिकारी यांच्या भेटीचे व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिवळा मोझाक आल्यामुळे फवारणी करता करता परिसरातील शेतकरी यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. या रोगामुळे झाडाची पाने लहान होतात. काही पिवळसर होतात, वाढ खुंटते, शेंगाची संख्या सुद्धा कमी होते व शेतकऱ्याच्या उत्पादनात घट होते असा हा रोग. या रोगावर नियंत्रण करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यासाठी कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे येथील पीक शास्त्रज्ञ अक्षय इंझाळकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी श्री अशोकराव कऱ्हे, श्री बालाजी बिचुकले, श्री नंदकुमार मस्के, श्री सुखदेव राठोड या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनच्या झाडाची पाहणी केली असता, त्यात पिवळा मोझाकचा प्रादुर्भाव दिसून आला. यासाठी त्यांनी रोगाचा प्रसार करणाऱ्या रसशोषक किडीचा नियंत्रणासाठी निळे पिवळे चिकट सापळे लावावेत तसेच रसशोषक किडींच्या रासायनिक व्यवस्थापनासाठी लमडा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के + थेमिथोक्झाम 12.6 टक्के या संयुक्त 5 मि.ली प्रती 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी असा सल्ला त्यांनी दिला.
शेतामध्ये पांढरी माशी, मावा या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव असेल व एखादे झाड विषाणू बाधित असेल तर त्या बाधित झाडावरील रसशोषक किडीं पासून इतर झाडामध्ये या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे शेतात असे एखादे बाधित सोयाबीन चे झाड दिसून आले तर ते तात्काळ उपटून जाळून टाकावे किंवा नष्ट करावे असे आव्हान उपविभागीय कृषी अधिकारी डॉ.प्रशांत नाईक यांनी केले.
ह्याचा प्रादुर्भाव हा फुले संगम या वाणावर मोठ्या प्रमाणात दिसून असल्याचे शेतकऱ्याच्या निदर्शनास येत आहे.
यावेळी तंत्रज्ञान समन्वयक नितीन रिठे यांनी शेतकऱ्यांना पुढील हंगामात पिवळा मोझाक रोगाचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर बीजप्रक्रिया व सोयाबीन ची लागवड ही बी बी एफ पद्धतीने करून शून्य मशागत तंत्रज्ञान अवलंब करण्याविषयी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे यांनी शेतकऱ्यांना तुमच्या किडी व रोगाचा समस्या आमच्या पर्यंत पोहचवल्या तर आम्ही त्या शास्त्रज्ञाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी नेहमी तत्पर राहू असे आव्हान केले. तसेच फुले संगम या जातीची घेतली कृषी विभागांनी दखल. शेतकऱ्याच्या मागणीला तालुका कृषी अधिकारी यांनी शास्त्रज्ञांना घेऊन केले मार्गदर्शन, शेतकरी निरंजन कवाने, कुबिर राठोड, अशोक करे संभाजी कवाने सरपंच शरद राठोड विटल करे केशव बिचकुले, पिंटु पावडे, रंगराव ठाकरे, बाबुसिंग चव्हाण, मोहन चव्हाण, रूपेश करे, पिंटु पिटलेवाड, सह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
या प्रक्षेत्र भेट व मार्गदर्शन साठी मंडळ कृषी अधिकारी के एस राठोड, कृषी सहायक नंदकिशोर आडे, साईनाथ झरीवाड, अविनाश वाघमारे तसेच यावेळी कासारबेहळ, वरोडी, सेवानगर या परिसरातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. त्यांनी पिकावरील रोग व किडी संबधित समस्यांची सोडवणूक करण्यासाठी उपस्थितीतांना मार्गदर्शन मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले.