'पोल्युशन मुक्त - Go Green' प्रचाराची संकल्पना राबविणारा महाराष्ट्रात पहिला केतन पारखी

"केतन पारखी" (9 ऑगस्ट)

                           अभिष्टचिंतन!!

जीवनप्रवासात आयुष्य जगत असतांना ह्या सुंदर भूतलावर आपण जन्माला आलो याचा आनंदोत्सव म्हणून जन्मदिवस साजरे होतात आणि होतच राहतील. पण काही व्यक्तीमत्व अशी असतात ज्यांचे जन्मदिवस फक्त स्वतः पुरताच आनंदोत्सव साजरा करण्याकरीताच करत नाहीत तर आपला जन्मदिवस साजरा होतांना दुसऱ्याच्यां जीवनात आनंद कसा निर्माण करता येईल ह्याच भावनेतून साजरे केले जातात. आज ज्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे ते व्यक्तीमत्व म्हणजे वणी, मारेगाव,झरी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून ज्यांनी समाजात आपलं वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. आता नागपूर ला त्यांनी स्वतःची "सह्याद्री" मिडिया नावाची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फर्म आहेत. सामाजिक कार्य करून सुद्धा कुठल्याही प्रशस्तीचा मोह न बाळगता निरंतर काम करत असतो. मग बेरोजगारांचा प्रश्न असो, वणी ग्रीन वृक्षरोपण असो, निशुल्क स्पर्धा परीक्षा असो, की मग गरीब कुटुंबातील मुलांना परवडेल अशा कमी दरात संगणक प्रशिक्षण असो. भाऊसाहेब नेहमी काहींना काही कार्य करत असतात. त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना उदंड आयुष्य लाभोत...हीच सदिच्छा...