टॉप बातम्या

खोपडी-चोपडी या गावाचा संपर्क तुटला..


चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : गेल्या आठवड्याची उघडीप दिल्या नंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने पिके पुन्हा पाण्याखाली आली आहेत.
दारव्हा तालुक्यातील खोपडी-चोपडी येथे फुलावरून पहिल्यांदाच पाणी पुराच्या पाण्याने गावाचा संपर्क तुटला. पुराचे पाणी नाल्याच्या काठावर असलेल्या शेतात शिरले. यामध्ये जवळपास शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली आहेत. परवा मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस कोसळला. तसेच काल सकाळ पासून सुरु झालेल्या संततधार पावसाने खोपडी चोपडी येथील पुलाला पुर आला. यामध्ये पुराचे पाणी नाल्याच्या काठावर असलेल्या शेतात शिरले. खोपडी-चोपडी येथील नाल्याच्या काठावर असलेली शेकडो हेक्टर जमिन खरडुन गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 
शेतातील पिके पाण्याखाली आले असल्याचे चित्र शेतशिवारात पहायला मिळाले. त्यामुळे अशी पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान खोपडी-चोपडी येथे झाले. असल्याचे प्रेम राठोड (माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ) यांनी सांगितले. दुपारच्या आलेला पुर उशिरापर्यंत ओसरला नसल्यामुळे या मार्गावर असलेली वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही गावाला पुराचा तडाखा बसला आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();