सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : मागील महिन्यात पावसाचा कहर. त्यानंतर वरूनराजाने काहीशी उसंत घेतली असतांना पुन्हा दोन दिवसापासून सुरु झालेल्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले आहे. अप्पर वर्धा, निम्न वर्धा, बेंबळा प्रकल्प, इसापूर प्रकल्प, यातून विसर्ग वाढल्याने वर्धा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पुन्हा या वर्धा नदी काठावरील गावात पाणी शिरण्याची शक्यता वाढली. कालपासून वर्धा नदी वरील पाटाळा पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे वणी वरोरा मार्ग बॅरिकेट लावून बंद करण्यात आला असून या मार्गांवरील वाहतूक घुग्गुस चंद्रपूर मार्गे वळविण्यात आली आहे. सदर मार्गांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वणी पोलीस भर पावसात कर्त्यव्यावर आहे.