“स्वातंत्र्याच्या जल्लोषाचा,
महिमा हा आगळा
अमृत महोत्सवी वर्षात
साजरा करू उन्नतीचा सोहळा
स्वातंत्र्याचे जतन कराया
त्यागाचा मार्ग धरू वेगळा”
उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर
सावली : दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या या पर्वाला प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ ऐश्वर्या गेडाम मॅडम, डॉ.गोबाडे सर कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महान नेत्यांनी, क्रांतीविरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांच्या पवित्र स्मृती आपण कायम ठेऊन कर्तव्य बुद्धीने 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो.
कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रध्वजाला सलामी देत ध्वजारोहणाने झाली त्यानंतर ‘हे राष्ट्रदेवता…..’ हे देशभक्तीपर गीत मोठ्या अभिमानाने गाऊन संपूर्ण वातावरण देशभक्तीमय केले.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ ऐश्वर्या गेडाम मॅडम यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हणाल्या की, प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव असायला पाहिजे. देशभक्तीची भावना मनात बाळगून मिळालेल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले पाहिजे. हा दिवस केवळ उत्सव म्हणून साजरा करण्यासाठी नसून दृढ संकल्प घेण्याच्या हेतूने असला पाहिजे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ ऐश्वर्या गेडाम यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्या दिल्या.