कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : सतत संततधार पाऊस पडल्याने वर्धा अप्पर, निम्न वर्धा, बेंबळा व इसापूर यातून विसर्ग झाल्यामुळे वर्धा नदी ओसंडून वाहू लागल्याने उकणी गावातील बहुतांश दीडशे च्या वर घरे बुडाली शंभर च्या वर शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्यामध्ये गेल्या तसेच शेतातील शेती उपयोगी साहित्य व खते पुरात वाहून गेल्याने यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
उकणी गावाच्या सभोंवताल कोळसा खाणी आहे त्या खाणीतून उत्कखनन केलेली मातीची ढिगारे चुकीच्या पद्धतीने गावाच्या सभोवताल टाकून डोंगर निर्माण झाल्याने वर्धा नदीचे पाणी उकणी गावात शिरले, त्यामुळे कित्येकांना या महापुराचा बसलेला फटका सोसावा लागला. यावर्षी एक नाही दोनदा महापूर आल्याने येथील नागरिक प्रचंड दहशतीत आली आहे.
परिणामी नुकसान ग्रस्त घरांना 1 लाख रुपये मदत देण्यात यावी व शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये आर्थिक मदत तात्काळ सर्वे करून देण्यात यावे, गावाचे सुसज्य योग्य ठिकाणी पुनर्वसन करून योग्य मोबदला देवून करण्यात यावे, बेरोजगारांना परिसरात कामे नसल्याने वेकोली कंपनीत रोजगार द्यावा, अश्रीतांना नोकऱ्या द्यावात, अशी मागणीचे निवेदन उकणी गावातील नागरिकांनी वणी उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी माजी सरपंच सरपंच खाडे, संगीता खाडे, सतीश खाडे, आशिष बलकी, प्रविण खेमेकर, सुरज पारशिवे, अजय खाडे,राजू धांडे, सतीश लोडे, यश निंदेकर, हिरादेवे इत्यादी उपस्थित होते.
जाहिरात पाहण्यासाठी वरील विडिओ click करा