टॉप बातम्या

डॉ.नरेंद्र दाभोलकर निर्घृण हत्येचा तपास करण्याचे राष्ट्रपती प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनातून उदगीर अनिसची मागणी


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : विवेकी विचारांचे लेखक संपादक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात झाला.
परंतु अद्याप या खुणाचा तपास लागला नाही. या तपासणीचा शोध घेण्यासाठी उदगीरचे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेगशेट्टी व तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्म, प्रधान मंत्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन उदगीर शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
हे निवेदन देते वेळी उदगीर अनिस शाखेचे अध्यक्ष विश्वनाथ मुडपे, बाबुराव माशाळकर, शिवाजी गोटमुकले, बालाजी सुवर्णकार, अहमद सरवर शेख, वरिष्ठ पत्रकार व्ही.एस. कुलकर्णी, खुर्शीत शेख ई. अनिस चे पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();