योगेश मडावी | सह्याद्री चौफेर
झरी : मौजा बोपापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालयासाठी तार कपांउड व फेवर ब्लॉक बसविण्यासंदर्भात वैभव मिलमिले, माजी सरपंच विलास नैताम व ग्रामस्थांनी (15 वित्त आयोगातून) गाव विकासाकरिता सचिवांना काम त्वरित मंजूर करून आणण्याबाबतची मागणी निवेदन देवून करण्यात आली.
सतत च्या पावसाने शाळेच्या पटांगणात चिखलाचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना एका वर्गातून दुसऱ्या वर्गाकडे जाण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे ग्रामसेवकांनी शाळा व ग्रामपंचायत करिता तार कंपाउंड, शौचालयाचा आराखडा तयार करून त्वरित ही कामे मंजूर करून आणावी अशी मागणी येथील ग्रामस्थांची आहे.
शाळा हे विद्येचे मंदिर आहे आणि त्या विद्या मंदिराची अवस्था बिकट असून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ओढ आणखीन निर्माण व्हावी म्हणून शाळे ची इमारत प्रशस्थ असणे आवश्यक आहे. त्यामुळे शाळेला व ग्रामपंचायतीला अपेक्षित कामे त्वरित मंजुर करून आणावे यासाठी ग्रामसेवकाला निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाची दखल घेवून सदरील कामे मंजूर करून त्वरित कामे सुरु करण्यात यावे, असे न झाल्यास आम्ही गावकरी या संदर्भात आंदोलन करू असा ईशारा जनसेवक वैभव मिलमीले व माजी सरपंच विलास नैताम आणि ग्रामस्थ यांनी निवेदनातून दिला आहे.
दिलेल्या निवेदनावर सह्या करणारे वैभव मिलमीले, विलास नैताम, अमोल पेन्दोर, केवलदास मडावी, सुनिल पेन्दोर, भारत जुमनाके, अमोल आवारी, बंडु चांदेकर, शत्रु चिकराम, जिवन कोडापे, अविनाश मडावी, हर्षल पेन्दोर, निळकंठ मडावी, देविदास मडावी, प्रज्वल मडावी यांच्या आहे.