जागतिक आदिवासी दिनानिमित्त मारेगाव शहरात जल्लोष!

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : जागतिक आदिवासी दिनानिमित्त मारेगाव शहरात भव्य "सांस्कृतिक रॅली" चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विविध आदिवासी वाद्य कलापथक,नृत्य पथक यांनी रॅली मध्ये सहभाग घेतला आणि आदिवासी वाद्याने संपूर्ण शहर गजबजले. 
यावेळी तालुक्यातील कोलाम पोडावरून मोठ्या प्रमाणावर लोक स्वयंस्फूर्तीने उपस्थित होते. मागील 3 दिवसापासून पावसाचे प्रमाण असतानाही मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज एकवटला होता. या रॅली चे निमित्याने तालुक्यातील आदिवासींचे एकता दाखवून देण्याची संधी या निमित्याने साधण्यात आली. यावेळी आदिवासी महिलांची संख्या लक्षणीय होती. आदिवासी बहुल तालुका असल्याने येणाऱ्या काळात राजकीय लोकांना आदिवासी समाजाची दखल घेतल्याशिवाय पर्याय नाही असे जाणकारांचे मत आहे.
यावेळी श्री.शंकरराव मडावी नगरसेवक, श्री.आनंदराव मसराम, श्री. तुळशीराम पेंदोर सर, श्री.संजय आत्राम सर, श्री.पैकूजी आत्राम सर, श्री.गंगाधर लोनसावळे महाराज, श्रीमती अनिता परचाके नगरसेविका, श्रीमती भादिकर नगरसेविका, श्री.अनिल गेडाम नगरसेवक, श्री. सोयाम सर, श्री.मंडाली, श्रीमती माया पेंदोर, श्री.राहुल आत्राम, श्री.सुनील गेडाम, श्री.विजय मेश्राम,श्री.चेतन तोडसाम, श्री.शेषराव मडावी, शैलेश जुमनाके, रोहित वेट्टे तसेच करणवाडी, सालेभट्टी, वेगाव, सोनुर्ली, खडकी, अर्जुनी येथून बँड पथक, नृत्य पथक आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी श्री.शंकर मडावी सर यांनी आभार प्रदर्शन केले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();