सह्याद्री चौफेर | न्यूज
मारेगाव : तालुक्यातील दांडगाव येथे एका 14 वर्षाच्या बालकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज (ता.11 ऑगस्ट) रोजी सकाळी दहा च्या सुमारास घडली. या हृदयद्रावक घटनेने समाजमन सुन्न झाला आहे.
मानस बाळकृष्ण शेंबळकर असे गळफास घेवून आत्महत्या करणाऱ्या बालकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार मृतक हा जिद्दी स्वभावाचा असल्याचे समजते. एखादी गोष्ट मागितली की, त्याला ती मिळाल्याविना चैन नसे असं त्याचे इचक,अल्लढ वागणं होते, अशी चर्चा गावात आहे. आई हा लहान असतांना सोडून गेल्याची माहिती आहे. तेव्हा पासून वडिलांनी मोलमजुरी करून मुलांना लहान्यांचे मोठं केले. मात्र, त्याच्या मृत्युंचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट असून त्याच्या पश्चात वडील, मोठा भाऊ असा बराच आप्त परिवार आहे.
पुढील तपास मारेगाव पोलीस करित आहे.