ध्येय्यवादी युवा संघटन मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्हा परिषद शाळा निवळी येथे विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील निवळी दुर्गम भागातून जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षण घेऊन पुढे उच्च शिक्षित तरुणांनी शैक्षणिक जीवनात स्थापन केलेल्या ध्येय्यवादी युवा संघटन या संघटनेमार्फत आज स्वत:च्या गावातील जिल्हा परिषद आदर्ष शाळा निवळी मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात संघटन सचिव:-दैवत पवार (M.Sc Analytical) यानी संघटनेमार्फत विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप करत विद्यार्थ्याना मार्गदर्षन केले.या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच सौ.चंदना घडशी,शाळा मुख्याध्यापक मा.श्री.पर्शुराम चौगुले सर ,शाळा समिती
अध्यक्ष कृष्णा बडद,तंटामुक्ती अध्यक्ष काशिरामजी घडशी,निवळी गावचे ग्रामसेवक श्री.सी.एस.शिंदे,ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच जिल्हा परिषद शाळा निवळीचे शिक्षक श्री.समाधान पालोदकर,शिक्षिका नैना पाडवे,अंगणवाडी सेविका, तसेच महादेवजी पवार,भरतजी घडशी, संतोषजी कुवळेकर, संदिप पवार,संदिप दरडे,अतुल पवार,शांताराम घडशी,रोशनी पवार व ईतर ग्रामस्थ उपस्थित होते.