विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, निसर्गरम्य परिसर पाहुन मन मोहुन गेल्याशिवाय राहणार नाही


चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : तालुक्यातील पाथ्रड देवी येथील गाेकी प्रकल्प धरण असून पर्यावरणाचा र्‍हास अनं त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच दिसत आहेत. पण अश्याही परिस्थितीत यंदाच्या पावसाळ्यात गोकी प्रकल्पाच्या कुशीत निसर्ग विसावला आहे. शक्ति स्वरूपाचे रुप असलेल्या पाथ्रड (देवि) तील जगदंबा उर्फ लखमाई मातेचे पौराणिक महत्त्व असलेला हा परिसर हिरव्या गर्द वनराईने नटला असुन या भागात पर्यटनास प्रचंड वाव असतांना पाहिजे तसा विकास झाला नाही, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.पाण्याच्या पाठीवरती किती रेघोट्या निरेषा पानावर लिहीली असते, पक्षाची बोलीभाषा, पानांची ओंजळ होता सावरतो थेंब दवाचा, की कुशीत या झाडाचा वाढतो वंश मेघांचा यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील पाथ्रड (देवी) येथे पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले जगदंबा उर्फ लखमाई मातेचं तिर्थक्षेत्र आणि निसर्गरम्य परिसर पाहुन मन मोहुन गेल्याशिवाय राहणार नाही.            

पाथ्रड (देवी) चा परिसर यंदाच्या पावसाळ्याने अधिकच बहरला. उंच उंच सागवानी हिरवीकच्च झाडे मनाला खिळवून ठेवते. चिकणी,आमशेत, उमरठा या मार्गे जातांना हे हिरवेगार दृश्य पाहुन संपुर्ण दिवस या परिसरातच घालवावा असं आपल्या मनाला वाटतं. गोकी मध्यम प्रकल्प तुडुंब भरल्याने सांडव्यावरून शुभ्र निळसर पाणी नाना पाटेकरांच्या "गिरो सालो गिरो, मगर उस झरणे की तरह" या डॉयलाॅगची आठवन करुन देते. या गावातील प्रतेकालाच "गाव माझे चिमुकले, जणु प्रेमळ घर हे घरट्यांनीच बांधले,पाऊल ठेवताच या गावामध्ये वाटे एखादे मुल जणू हळुच आईच्या कुशित शिरले, निसर्गरुपी आईच्या कुशीत पाथ्रड देवी आज मुला प्रमाणे विसावले आहे. "गावातील लोकांची एकमेकांप्रती असलेली आपुलकी इथेही आज दिसुन आली. गोकी प्रकल्यातील पावसाळ्याच्या पाण्यामुळे जसा हा परिसर निसर्ग सौंदर्याने खुलतो. तसा तो उन्हाळ्यातही रहावा म्हणुन शासन आणी प्रशासनाने या निसर्गसौंदर्य स्थळाला भेट देवुन त्यातील जिवंतपणा कायम राखावा. अशी मागणी स्थानिक गावकर्‍यांच्या वतीने सातत्याने होत आहे.

पाथ्रड देवी येथे यवतमाळ जिल्ह्यातील अनेक ठिकाणांवरून प्रेक्षकवर्ग हजेरी लावतांना दिसुन येतात.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();