खासदार बाळू भाऊ धानोरकर व माजी आमदार कासावार यांचा पूर परिस्थिती पाहणी दौरा

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : दोन दिवसापासून पावसासह पुराणे कहर केल्याने पुन्हा नाले,नदी काठावरील गावांना या आलेल्या महापुराचा तडाखा बसला आहे. दुसऱ्यांदा शेती, घरे पुराच्या कवेत आल्याने मा खासदार बाळू धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांचा पूर परिस्थिती पाहणी दौरा मा नरेंद्र पाटील ठाकरे, व अरुणाताई खंडाळकर यांच्या उपस्थितीत आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी ठीक 3 वाजता मारेगाव वरून मार्डी मार्गे दापोरा येथील पूर (पुल) परिस्थिती पाहून चोपण मार्गे शिवणी वरून वनोजा देवी येथील गावांना भेट देवून पूर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. या दौऱ्या दरम्यान पूर पीडितांच्या समस्या मागण्या जाणून घेण्यात आल्या असून त्या सरकारकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी माहिती अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी मारेगाव मारोती गौरकर यांनी दिली आहे.
या दरम्यान, पदाधिकारी,नगरसेवक, व काँग्रेस कमिटी चे कार्यकर्ते तालुका काँग्रेस, महिला तालुका काँग्रेस व इतर सर्व फ्रंटल चे अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();