चंदू राऊत | सह्याद्री चौफेर
मारेगाव : तालुक्यातील पुर परिस्थिती बिकट झाली असून बॅक वाटर मुळे नदी लगत असलेल्या गावं प्रभावित झाले असतांना शिवणी (धोबे) गावातील काही कुटुंबीयांनी घर सोडून दुसऱ्याच्या घरी मुक्कामाला गेली असून वनोजा (देवी) गावात पाणी शिरले आहे.
वनोजा येथील जिल्हा परिषद शाळेच्या बाजूच्या भागातील घरात पाणी शिरले असून लोकांनी घरातील सामान हलवाण्यास सुरुवात केली असून शिवणी व वनोजा येथील गावाचा संपर्क तुटला. नाल्याला आलेल्या डाबी (back वाटर) मुळे जन जीवन प्रभावित झाले असून कित्येकांचे शेत माल पाण्याखाली आले आहे. शिवणीसह वनोजा सह दांडगाव येथे पुराचे पाणी गावात आणखी घुसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तालुक्यात अतिवृष्टी मुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. मोठ्या प्रमाणात या 'बॅक वाटर' चा शेतकऱ्यांना फटका बसला असून हजारो हेक्टर च्या वर जमिनी पाण्याखाली आल्याने आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सोसवेनासे आहे. शिवणी, दांडगाव, आपटी, शेलू, रांगना, भुरकी, वनोजा नाजूक अवस्थेकडे सद्य स्थिती असून त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. शिवाय प्रभावित गावांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्याची,पूर परिस्थिती येवून आहे.