मानव विकास मिशन अंतर्गत बसेस तात्काळ सुरू करा - संभाजी ब्रिगेड ची मागणी

नितेश पत्रकार | सह्याद्री चौफेर 

वणी : संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शालेय नवीन सत्र सुरू झाले आहे. त्यातच झरी जामणी तालुक्यातील शाळा आणि कॉलेज देखील सुरू झाले आहेत. परंतु परिवहन व्यवस्थेत झालेल्या दर वाढीमुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्याकरिता अडथळा निर्माण होत आहेत.
त्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची पाळी येत आहे. झरी जामणी तालुका हा मागासलेला तालुका आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना योग्य त्या वाहतुकीच्या व्यवस्था नाही. आणि आहे ते भाडे परवडणारे नाही. त्याकरिता मानव विकास मिशन अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या बससेवा विद्यार्थ्यांसाठी त्वरित सुरू कराव्या अशी मागणी करण्यात आली.
बस सेवा सुरू करण्यासाठी आज वणी आगर व्यवस्थापक यांची भेट घेवून आगर प्रमुखाशी चर्चा केली. तेव्हा असे दिसून आले की,बस सेवा सुरू करण्यात येत आहे. परंतु बस सेवा सुरू करण्यासाठी झरी तालुक्यातील कोणत्याही शाळा मुख्याध्यापक, कॉलेज चे प्राचार्य यांनी आगार प्रमुखाकडे विद्यार्थी संख्या व बस चालू करण्यासाठी पत्रव्यवहार केला नाही. त्यामुळे बस सेवा सुरू होण्यास विलंब होत आहे. अशी धक्कादायक माहिती समोर आल्याने संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष आशिष झाडे यांनी शाळा व कॉलेज व्यवस्थापक यांना आव्हान केले की, जर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास आम्ही उपोषणाला बसणार, त्यासाठी शाळा कॉलेज व वणी आगार जबादार राहील अशा इशारा दिलेल्या निवेदनातून केला आहे. 
मानव विकास मिशन अंतर्गत बसेस तात्काळ सुरू करा - संभाजी ब्रिगेड ची मागणी मानव विकास मिशन अंतर्गत बसेस तात्काळ सुरू करा - संभाजी ब्रिगेड ची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on July 01, 2022 Rating: 5
Powered by Blogger.