सह्याद्री चौफेर | न्यूज
झरी : तालुक्यातील बोपापुर येथे पंढरपुराला जावुन येणाऱ्या वारकऱ्यांचा महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या हर्ष उल्हासात पार पडला. पंढरपुर हे संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत. पंढरपुराला जावुन येणाऱ्या वारकऱ्यांकडुन सतत दोन दिवस वारकरी भजनासह महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या हर्ष उल्हासात करण्यात आला. त्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, वैभव मिलमिले, समीर भाऊ सिडाम, नागो मत्ते, गोविंदा पाऊनकार, सुरेश आवारी, प्रभाकर ढेंगळे, पंढरी विंचु, धनु मत्ते, महेश मिलमिले, देविंद्र पिदुरकार, यादव उरवते, मधु मत्ते होते.
बोपापुर गावाची आराध्य देवी "सुरदेवी" यांना दैवत असलेल्या कार्यक्रमाचे नियोजन झाले. नव युवक मंडळीनी भरपुर सहकार्य केले. दि. रोज 19 जुलै रोजी संध्याकाळी वारकरी भजनाचा कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमाला वाढोणा येथील वारकरी भजन मंडळानी कार्यक्रम गजरात पार पडला. दि. रोज 20 जुलै 2022 ला सायंकाळी च्या सुमारास महाप्रसादाचा लाभ घेण्यास बोपापुर-बाळापूर येथील भक्तानी फार मोठ्या प्रमाणात गर्दी जमविली. आलेल्या प्रत्येक भक्तांचे टीळा लावुन स्वागत करण्यात आले.