टॉप बातम्या

पाण्यामध्ये अडकलेल्या 30 जणांना सुखरूप बाहेर काढले; सौ.रंजना पारशिवे यांचे उल्लेखनीय कार्य


कालू रामपुरे | सह्याद्री चौफेर

वरोरा : येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या जमाती सेलच्या विदर्भ प्रदेश अध्यक्ष सौ. रंजनाताई मनोहर पारशिवे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता 
वरोरा तालुक्यातील करंजी गावाला पूराच्या पाण्याने गराडा घातल्याने तेथे जवळपास 30 ते 35 अडकून असलेल्या लोकांना नाव उपलब्ध करून बाहेर काढले .त्यांना वरोरा येथील श्री साई मंगल कार्यालयत हलविण्यात आले.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

करंजी गावांमधील 25 ते 30 लोक पुरामुळे अडकले असल्याची माहिती तहसीलदार रोशन मकवानी यांनी सौ.रंजना यांना भ्रमणध्वनी द्वारे देऊन आपल्याकडे नाव किव्हा बोट उपलब्ध आहे कां ? विचारणा केली. तेव्हा त्यांनी वरोरा तलावात तर नाही मात्र चारगाव डॅम वरून मी बोलाऊ शकतो अशी त्यांना माहिती दिली .त्यांनी क्षणाचाही विचार न करता तात्काळ चारगाव डॅम येथे जाऊन सौ रंजना मनोहर पारशि़वेनी स्वखर्चाने नाव (डोंगा) बोलावून घेतल्या. सोबतच नाव चालवायला तीन व्यक्ती बोलावले.त्यात दिलीप विठ्ठल भलमे, प्रदीप रामकृष्ण भट, गुरुदेव भारत बावणे रा. चारगाव डॅम यांना घेऊन करंजी येथे पोहचलो.
तेव्हा करंजी गाव पाण्याने बुडाले होते. त्या ठिकाणी प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून भूमी अभिलेख ऑफिसचे अधिकारी हुलके साहेब उपस्थित होते. तसेच वरोरा पोलीस स्टेशन मधून मडावी साहेब व इतर त्यांचे 3 सहकारी त्या ठिकाणी लक्ष ठेऊन होते. त्या सर्वांच्या सहकार्याने बोटीद्वारे गावात पोहचून 25 ते 30 लोकांना पुरातून बाहेर काढले. त्यानां पाण्यातून सुरक्षित बाहेर काढून वरोरा येथील साई मंगल कार्यालयामध्ये त्या सर्व लोकांना आणून त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या. साई मंगल कार्यालयामध्ये करंजी गावातील 500 लोक सुरक्षित पोहोचविण्यात आले. त्यांच्या या कार्यात पती मनोहर पारशिवे लक्ष ठेऊन होते.त्यांच्या या कार्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();