विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : कालपासून पाण्याचा जोर वाढल्याने तालुक्यातील नदी, नाले भरून वाहत असतांना चिंचमंडळ येथील शेतकऱ्याच्या गोठ्यातील खताच्या 180 बॅग पुराच्या पाण्यात विलीन झाल्या आहे. तर जवळपास एक हजार गावरान पक्षी वाहून गेली. यात लाखों चे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
मागील सात ते आठ दिवस पावसाचा हाहाकार होता, त्यानंतर दोन उसंत घेतल्यावर कालपासून पुन्हा पावसाने कहर केल्याने बेंबळा ओव्हर फ्लो होऊन वाहू लागल्याने दापोरा येथील शिवार तर चिंचमंडळ पर्यंत बेंबळाचे पाणी येथील अतुल वाल्मिक पचारे या युवा शेतकऱ्याच्या शेतात पुराचे पाणी शिरताच गोठ्यातील रासायनिक खत एकूण 180 बॅग पाण्यात विरगळून तसेच एक हजार गावरान पक्षी वाहून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेती उपयोगी साहित्यही ही पाण्याने घेरली असून शेत व गोठा पाण्याखाली आला आहे.
अस्मानी व सुलतानी संकट, अशातच नाजूक अवस्था असल्याने युवा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदतीची गरज असल्याने प्रशासनाने दखल घेवून मोबदला द्यावा अशी मागणी युवा शेतकरी अतुल पचारे यांनी केली आहे.