कामाच्या शोधात आहात का? मग तुमच्यासाठी सुवर्ण संधी इथे आहे; एकदा बघाच...

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : येथील पोलीस स्टेशनच्या प्रांगणात भारत कार्पोरेशन पेट्रोल लिमिटेड कंपनीचे पेट्रोल पंप शहरात नव्यानेच सुरू होत आहे. या पेट्रोल पंपसाठी जंबो भरती होणार आहे. याकरिता अर्ज दाखल करण्याची 18 जून 2022 ही लास्ट डेट असून, सायंकाळी 6 पर्यंत मारेगाव पोलीस स्टेशनला अर्ज दाखल करण्याचे आवाहन ठाणेदार राजेश पुरी यांनी केले आहे.
16 जागेकरिता किमान बारावी उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार, कामगार युवक-युवतींना मोठी संधी प्राप्त होणार असून यात 2 महिला प्रवर्गाचा समावेश राहणार आहे.
18 ते 40 वयोगटातील बेरोजगारांना प्राधान्य देण्यात येणार असून, मासिक वेतन 5 हजार 490 रुपये देण्यात येणार आहे.
     
याकरिता अर्ज मागविण्यात आले असून,अर्जासोबत बारावी पासची मार्कशीटसह आधार कार्ड, रहिवासी दाखला, जन्म तारीख (DOB) चा दाखला, राशनकार्ड ची झेरॉक्स प्रत जोडणे अनिवार्य आहे. 18 जून 2022 पर्यंतच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज मारेगाव पोलीस स्टेशनला सादर करायचे आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांनी दिली.
बातमी व जाहिराती साठी संपर्क : 9011152179
कामाच्या शोधात आहात का? मग तुमच्यासाठी सुवर्ण संधी इथे आहे; एकदा बघाच... कामाच्या शोधात आहात का? मग तुमच्यासाठी सुवर्ण संधी इथे आहे; एकदा बघाच... Reviewed by सह्याद्री चौफेर on June 16, 2022 Rating: 5
Powered by Blogger.